पोलीस संचालकाने दिली कुस्तीपटूंना गोळी घालण्याची धमकी; तर कुस्तीपटू म्हणतो गोळी खायला कुठे भेटू…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

केरळचे माजी पोलीस महासंचालक (DGP) एनसी अस्थाना यांच्या व्बाद्ग्रस्त टि्वट वरून दिग्गज कुस्तीपटू बजरंग पुनिया याने त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. अस्थाना यांनी बजरंग पुनियाला इशारा दिला की, गरज पडली तर पोलीस, आंदोलक कुस्तीपटूंवर गोळ्या चालवतील. आस्थाना यांच्या टि्वटला पुनियाने उत्तर दिलय. मी छातीवर गोळी झेलण्यास तयार आहे, असं बजरंग पुनिया याने म्हटल आहे.

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाच उद्घाटन झाल. तिथून जेमतेम 3 किलोमीटर अंतरावर जंतर-मंतर येथे पोलीस आणि आंदोलक कुस्तीपटूंमध्ये झडप झाली. त्यानंतर बजरंग पुनिया आणि अस्थाना यांच्यात शाब्दीक वाद रंगला आहे. जंतर-मंतरवर आंदोलन करणारे कुस्तीपटू नव्या संसद भवनाच्या दिशेने कूच करत होते. त्यावेळी पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेतलं.

 

https://twitter.com/BajrangPunia/status/1663035209783099393?s=20

 

दरम्यान पोलीस रविवारी अनेक कुस्तीपटू आणि आंदोलकांना बसमध्ये भरुन दुसऱ्याठिकाणी घेऊन गेले. पोलिसांनी आंदोलन स्थळी असलेल्या गाद्या, पंखे आणि छप्पर हटवलं. त्यांनी विरोध स्थळाची जागा साफ केली. रविवारी रात्री एनसी अस्थाना यांनी एक न्यूज रिपोर्ट् रिटि्वट केलं.

त्यामध्ये अस्थाना यांनी “गरज पडल्यास गोळी चालवेन. आता तर कचऱ्याच्या गोणीसारखं खेचून फेकून दिलय. अनुच्छेद 129 अंतर्गत पोलिसांना गोळी मारण्याचा अधिकार आहे. योग्यवेळी ती इच्छा देखील पूर्ण होईल. यासाठी सुशिक्षित असलं पाहिजे. मग पोस्टमार्टम टेबलवर भेटूया” असं एनसी अस्थाना यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलय.

दुसऱ्या एका टि्वटमध्ये डीजीपी म्हणाले की, “काही मूर्ख पोलिसांच्या मनात गोळी मारण्याच्या अधिकाराबद्दल संशय आहे. जर तुम्हाला इंग्रजी वाचता येत असेल, तर तो अखिलेश प्रसादच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निर्णय वाचा”

बजरंग पुनियाने टि्वटमध्ये काय म्हटलय?

माजी आयपीएस अधिकारी आस्थाना यांच्या टि्वटवर बजरंग पुनियाचने प्रतिक्रिया दिली आहे. “IPS ऑफिसर आम्हाला गोळी मारण्याबद्दल बोलत आहे. भावा, समोर उभा आहे. गोळी खाण्यासाठी कुठे येऊ ते सांगा, शप्पथ आहे, पाठ नाही दाखवणार. छातीवर गोळी खाईन” असं बजरंग पुनियाने टि्वटमध्ये म्हटलय.

 

https://twitter.com/iamrenukadyan/status/1662734732931596290?s=20

Leave A Reply

Your email address will not be published.