घरगुती गॅस वाहनांमध्ये भरणाऱ्याचा भंडाफोड ! ; एकाला अटक

0

जळगाव ;– घरगुती गॅसचा गोरखधंदा करून रिक्षा , चारचाकी वाहनात भरणाऱ्या एका तरुणावर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याच्याकडून गॅस सिलेंडर, वजनकाटा, मशीन असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी सोमवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अब्दुल खालीद अब्दुल करीम (वय-२९, रा.फातिमानगर, एमआयडीसी जळगाव) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

जळगाव शहरात अनेक ठिकाणी घरगुती गॅसचा गोरखधंदा करून अवैधरित्या खाजगी वाहनांमध्ये भरून वापर केला जात असून एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील पोलीस कॉलनीजवळील एका रिक्षा स्टॉपजवळ संशयित आरोपी अब्दुल खालिद अब्दुल करीम हा घरगुती गॅसचा वापर खाजगी वाहनांमध्ये बेकायदेशीर दिल्या भरून काळाबाजार करत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडू गॅस सिलेंडर, गॅस भरणारे साहित्य असा एकूण ३४ हजार ३०० रुपये किमतीच्या मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस नाईक प्रीतम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अब्दुल खालिद अब्दुल कलाम यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.