३३ लाखांच्या संतूर साबणासह दोघांना अटक

0

अमळनेर पोलिसांची कारवाई

अमळनेर ;- येथील विप्रो कंपनीतून ४ जानेवारी २०२३ रोजी ३३ लाखांच्या संतूर साबणाची चोरी करण्यात आली होती . अमळनेर पोलिसांनी एक महिना आरोपींच्या शोधार्थ माहिती काढून दोन आरोपीना मुद्देमालांसह अटक केली आहे.

दि. ०४ जानेवारी २०२३ रोजी ०३.४५ वाजेच्या सुमारास अमळनेर शहरातील विप्रो कंपनी येथून आरोपीनी नावे वाहनाचे क्रमांक बदलवून संतुर साबण किंमत रुपये ३३,०२,६७८.४०/- रु. कि.चा १८ टन १०० किलो असा माल ट्रक मध्ये भरुन ठरल्याप्रमाणे तमकुर (कर्नाटक) येथे पोहचविणे करीता ताब्यात घेवुन सदरचा माल सदर ठिकाणी पोहच न करता मालाचा अपहार करुन विप्रो कंपनीची फसवणुक बाबत ट्रॉन्सपोर्टचे अनिल कुमार पुनिया यांनी दिलेल्या फिर्याद वरुन दि. १०/०१/२०२३ रोजी गुन्हा दाखल होता.

सदर गुन्ह्यांत अनोळखी ट्रक चालक व मालक यांनी त्यांची नावे व बनावट कागदपत्र तसेच वाहनाचे ड्युप्लीकेट नंबर प्लेट बनावट कागदपत्रे ट्रॉन्सपोर्ट कडे सादर केले असल्याने त्याचे खरे नावे व पत्ते तसेच ट्रकचा मुळ क्रमांक याबाबत काहीएक माहीती उपलब्ध नसतांना वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळुन आलेल्या परीस्थितीजन्य तसेच तांत्रिक पुरावे व बाहेरील राज्यातील मिळविलेला गोपनिय बातमीदारा मार्फत तसेच अमळनेर ते राजस्थान पावेतो टोल नाक्यावरील मिळुन आलेल्या माहीतीनुसार पथकातील अधिकारी व अमलदार यांचे तपास पथक तयार करुन त्यांना योग्य त्या सुचना देवुन सदरचे पथक सलग एक महीना राजस्थान/गुजरात राज्यात पाठवुन आरोपी बाबत माहीती गोळा करुन आरोपी जगदीश बालकिशन भार्गव यांस पथकाने ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला हजर केल्यावरून पो. नि. विजय शिंदे यांनी विचारपुस करुन त्याने त्याचे इतर सहा साथीदारासह सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली.

त्यावरून सदर गुन्ह्यात आता पावेतो सात आरोपींना निष्पन्न करून तीन आरोपी अटक करण्यात येवुन त्यांचे कडुन १८,५६,४००/- रु. कि. चा संतुर साबण ३२५ बॉक्स हस्तगत करण्यात आले आहेत आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येवुन त्यांची पो.क. रिमांड घेतली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव सो यांनी या गुन्ह्यांत वेळोवेळी उपयुक्त सुचना दिल्या आहेत. तसेच अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.

सदरच्या अपहार प्रकरणी पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी वेळोवेळी तपासाची माहीती व आढावा घेवुन सुचना दिल्या होत्या व तपास पथके पर राज्यात पाठविण्यासाठी आदेश दिलेले होते. तसेच त्यांनी स्वतः अमळनेर पोलीस स्टेशनला भेट देवुन हा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल अमळनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे. तसेच अमळनेर पोलीसांनी चैन स्नॅचिंग पाच गुन्हे उघडकीस आणले आणि पेट्रोलपंपचा बंदुकीचा धाक दाखवुन जबरी चोरी असे सर्व गुन्हे उघड करुन आरोपीना अटक केल्याबाबत व त्यातील मुद्देमाल हस्तगत केल्याबाबत अमळनेर पोलीसांनी केलेली मोठी व भरीव कामगिरी बाबत प्रशंसा व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.