प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधून दागिने लंपास

0

चोपडा ;- अज्ञात चोरट्याने दीड लाख रूपयांचे दागिने बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधून चोरून नेल्याची घडना घडली आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुभांगी अतुल शिंदे (वय-२७) रा. चुंचाळे ता. चोपडा ह.मु. वापी गुजरात या महिल्या कामाच्या निमित्ताने २७ मे रोजी रोजी बसमधून प्रवास करत असतांना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पर्समधुन दीड लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने लांबविले. हा प्रकार लक्षात आल्याने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र सोनवणे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.