१४ वर्षाच्या मुलाचा ७ वर्षीय बालिकेवर अत्याचार

0

चोपडा (प्रतिनिधी) : –मोबाईलच्या वापरामुळे एका एका १३ वर्ष ९ महिन्याच्या मुलाने गावातीलच ६ वर्ष १० महिन्याच्या बालिकेवर अत्याचार केल्याची घटना उघडकिस् आली आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ५४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. घटनेतील पीडिता आणि संशयित आरोपी हे एकाच गावातील रहिवासी आहेत. गुरुवारी ८ जून रोजी संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा वाजेच्या दरम्यान गावातील एका घराच्या गच्चीवर असणाऱ्या खोलीत संशयित मुलाने सदर बालिकेला चेंडू देण्याचे आमिष दाखवून घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. बालिकेच्या आजीच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.