क्षुल्लक कारणावरून तरुणावर चाकूने वार

0

जळगाव ;- तिघांनी तरुणास हळदीच्या कार्यक्रमात सुरु असलेले गाणे बदलण्यास सांगितले, याचा राग आल्याने मारहाण करून चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. बुधवारी ७ रोजी रात्री ही घटना म्हाडा कॉलनी येथे घडली. एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन भरत महाले, रा. अयोध्यानगर असे जखमीचे नाव आहे. सचिन महाले एका लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमाला त्याच्या मित्रांसोबत गेला होता. त्यावेळी त्याने सुरु असलेले गाणे बदलण्यास सांगितले. त्याचा तिघांना राग आला. त्यातील संशयित दिपक चव्हाण आणि आकाश लासुरे या दोघांनी सचिन महाले यास दगडाने मारले. दरम्यान तिसरा संशयित गणेश लोहार याने त्याच्या खिशातील चाकूने सचिनच्या छातीवर उजव्या बाजूला खुपसून गंभीर दुखापत केली.

तु जर पोलिस स्टेशनला आमच्याविरुद्ध तक्रार दाखल केली तर यापेक्षा जास्त मारु अशी धमकी तिघांनीदिल्याने याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हे.कॉ. विजय पाटील करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.