प्रेमचंद अहिरराव यांच्या ‘जंगल सहल’ या बालकविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न….

0

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क

शिवव्याख्याते म्हणून सुपरीचित असलेले प्रेमचंद अहिरराव यांच्या ‘जंगल सहल’ या बालकविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा धुळे येथील कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ कवी प्रभाकर शेळके, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, हर्षवर्धन दहिते, (कृषी सभापती जि.प.धुळे) आरती पवार (नगरसेविका), ज्योत्सना पाटील, मनीषा पाटील (सरपंच दळवेल) (नगरसेविका), पत्रकार निंबा मराठे, सुनील दहिते(उद्योजक) मनोज मोरे, (जिल्हाप्रमुख शिवसेना) अरुण पवार, प्रदीप जाधव, प्रफुल्ल पाटील, विठ्ठल पाटील, प्रभाकर पाटील (उपअधीक्षक शुल्क अधिकारी) विश्वास पाटील, (गटशिक्षणाधिकारी) प्रेमकुमार अहिरे, राजेंद्र भदाणे, करुणा देवकर (केंद्रप्रमुख), रजनीबाई पाटील, अल्का पाटील, उज्वला दहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अध्यक्षीय भाषणात प्रभाकर शेळके यांनी सांगितले की, प्रेमचंद अहिरराव हे नव्या संकल्पना मांडत बालकाव्याच्या प्रांतात मनोरंजनासह ज्ञानरंजन आणि मूल्यवर्धन जोपासण्यासाठी आगळ्यावेगळ्या काव्यरचना करतात हे खरोखर प्रशंसनीय आहे. त्यांच्या अनेक बालकविता ह्या आपल्याला स्वैर आनंद तर देतातच, परंतु मूल्यांची जोपासनूकही करायला लावतात हे त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल असेही त्यांनी नमूद केले. यावेळी चिन्मयी पाटील या बालिकेने प्रेमचंद अहिरराव यांच्या ‘जंगल सहल’ बालकवितासंग्रहातील ‘छोटुलं बाळ’ ही कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. नलिनी पाटील प्रा. माधुरी पाटील तर आभार प्रदर्शन मनीषा देवरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वप्निल करंकाळ, गोकुळ पाटील, अमोल जगताप, संदीप पवार, संजय पाटील, योगेश सावळे, सीमा पाटील, देवेंद्र देवरे, पंकज अहिरराव, हर्षल अहिरराव यांनी विशेष प्रयत्न केले.

Leave A Reply

Your email address will not be published.