मीरा रोड येथील हत्याकांडाला नवीन वळण, वाचा सविस्तर

0

मीरा रोड, लोकशाही न्यूज नेटवर्क

मीरा रोड (Meera Road) येथील हत्याकांडात अनेक नवीन वळण समोर येत आहे. मृत महिला सरस्वती हिच्या नातेवाइकांना पोलिसांनी शोधून काढल आहे. तिची बहीण व नातेवाईक नाय नगर पोलीस स्थानकात पोहोचले असून, तिच्या बहिणीची रडून रडून अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. बहिणीच्या मृत्यूमुळे त्यांना धक्का बसला आहे. त्यांची अवस्था इतकी वाईट झाली आहे कि, त्यांना नीट जबाबही नोंदवता येत नाही आहे.

सरस्वती हिचे कोणीही नातेवाईक नसल्याची माहिती आत्तापर्यंत समोर आली होती. पण आता तिची बहीण व नातेवाईक समोर आले आहेत. पोलिस स्थानकांत येऊन त्या जबाब नोंदवत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, सरस्वतीच्या बहिणींची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. त्यांच्या बहिणीसोबत कोणी असं कृत्य करू शकतं, यावर त्यांचा विश्वासत बसत नाहीये. बहिणीच्या मारेकऱ्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

संपूर्ण घरात मृतदेहाचे तुकडे
सूत्रांच्या माहितीनुसार सरस्वतीने आत्महत्या केल्यानंतर मनोजने तिच्या मृतदेहाचे इलेक्ट्रिक कटरने तुकडे केले. छोटे छोटे तुकडे केल्यानंतर त्याने त्यातील काही तुकडे त्याने प्रेशर कुकरमध्ये शिजवले. नंतर गॅसवर ते भाजले. हे तुकडे सहज फेकता यावेत म्हणून त्याने हे कृत्य केलं. त्याने हे तुकडे बादली, टब, कुकर आणि किचनमधील भांड्यात ठेवले होते. त्याने सरस्वतीच्या देहाचे इतके तुकडे केले की पोलीस त्याची गिनतीही करू शकत नव्हते,

Leave A Reply

Your email address will not be published.