२०५ कोटींच्या संपत्तीवर ईडीची टाच

0

नवी दिल्ली: छत्तीसगडमधील कथित उत्पादन शुल्क घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या तपासादरम्यान अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) शुक्रवारी तब्बल २०५ कोटी रुपयांची संपती गोठवली. सेवानिवृत्त आयएएस अधिकारी अनिल टुटेजा, रायपूरच्या महापौरांच्या ज्येष्ठ बंधूंसह इतर काही लोकांची ही संपत्ती असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले.

या संपत्तीत टुटेजा यांच्या १५.८२ कोटी रुपयांच्या १४ संपत्तीचा समावेश आहे. रायपूरचे महापौर व काँग्रेस नेते ऐजाज ढेबर यांचे मोठे बंधू अन्वर ढेबर यांच्या ११६.१६ कोटी रुपयांच्या ११५ संपत्तीचा, विकास अग्रवाल ऊर्फ सुब्बू यांच्या १.५४ कोटी रुपयांच्या संपत्तीचा तर अरविंद सिंह यांच्या १२.९९ कोटी रुपयांच्या ३३ संपत्तीचा समावेश आहे. भारतीय दूरसंचार सेवेचे (आयटीएस) अधिकारी व उत्पादन शुल्क विभागाचे विशेष सचिव अरुणपती त्रिपाठी यांच्या १.३५ कोटी रुपयांची संपत्ती, त्रिलोक सिंह ढिल्लोंची २८.१३ कोटी रुपयांच्या ९ संपत्ती, नवीन केडियांचे २७.९६ कोटी रुपयांचे दागिने व आशिष सौरभ केडिया यांच्या दिशित व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची १.२ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता जप्त केली आहे. उत्पादन शुल्क घोटाळ्याप्रकरणी १८ जंगम तर १६१ स्थावर मालमत्ता गोठवण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत २०५- ४९ कोटी रुपये असल्याचा दावा ईडीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.