लासूर येथे धाडसी चोरी ; हजारोंचा ऐवज लंपास

0

लासूर ता.चोपडा(;- अज्ञात चोरट्यांनी बसस्थानक परिसरातील काही दुकाने तसेच गावातील २ घरे फोडल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.
पहाटे पाच वाजेच्या दरम्यान इंदुबाई बापू माळी तसेच श्रीराम गोपाल पालीवाल यांचे घराचे कुलूप तोडून धाडसी चोरीच्या प्रकार घडला यात इंदुबाई बापू माळी यांच्या घरातील ६४ हजार रुपये रोख रक्कम,३ भार वजनाची चांदीची कुबेर मूर्ती,८ हजार किंमतीच्या मोबाईल असा एकूण ७३ हजार ५०० किंमतीच्या ऐवज तर श्रीराम गोपाल पालीवाल यांच्या घरातील १७ हजार किंमतीचे सोने आणि एक हजार पाचशे किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले.

बाजारातील चेतन पालीवाल यांच्या मालकीच्या बापू डेअरी मधील काही वस्तूंसह चक्क सीसीटिव्ही कॅमेराच चोरट्यांनी उडविला असून काही दुकानांचे कुलूप फोडले परंतु काही चिल्लर रक्कम लंपास गेली.
घटनेची माहिती कळताच चोपडा ग्रा.पो.नि कावेरी कमलाकर यांनी पोलीस पाटील जितेंद्र पाटील यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन अज्ञातांवर गुन्हा नोंदविला.कलम ३५७,३८० प्रमाणे अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स.पो.नि शेषराव नितनवरे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.