Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»क्रीडा»फुटबॉल संघटना व क्रीडा अधिकारी कार्यालय लवकरच फुटबॉल लीग स्पर्धा घेणार – रवींद्र नाईक
    क्रीडा

    फुटबॉल संघटना व क्रीडा अधिकारी कार्यालय लवकरच फुटबॉल लीग स्पर्धा घेणार – रवींद्र नाईक

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 18, 2023Updated:September 18, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    फुटबॉल १९ वयोगटात डी एल हिंदी भुसावळ विजयी तर रायसोनी,जळगाव उप विजेता

    जळगाव ;- क्रीडा संकुल येथे फुटबॉल संघटनांचे माध्यमाने जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने लवकरच फुटबॉल लीग स्पर्धा व इतर खेळांच्या स्पर्धा घेण्यात येतील तसेच विविध खेळांची सेंटर सुरू करण्यात येईल असे नवनियुक्त जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी खेळाडूना आश्वासन दिले.

    जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा फुटबॉल संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय १९ वर्षातील फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन करताना रवी नाईक हे बोलत होते. यावेळी फुटबॉल संघटनेचे सचिव फारूक शेख यांनी त्यांचे प्रथमतः क्रीडांगणावर व खेळाडूंची संवाद साधला त्याबद्दल त्यांचे साने गुरुजी लिखित मराठीचे इस्लामी संस्कृतीचे पुस्तक देऊन स्वागत व सत्कार केले.यावेळी फुटबॉल संघटनेच्या कार्याध्यक्ष प्रा डॉ अनिता कोल्हे,तालुका क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण, क्रीडा मार्गदर्शक सुजाता गुल्हाने व मीनल थोरात आदींची उपस्थिती होती.फुटबॉल ला किक मारून व नाणेफेक करून नाईक यांनी स्पर्धेचे विधिवत उद्घाटन केले.या स्पर्धेचे पारितोषिक वितरण सॉफ्टबॉल राष्ट्रीय खेळाडू तथा राज्य क्रीडा मार्गदर्शक व ज्यांना शासनाने नुकतेच शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केले ते किशोर चौधरी यांच्या हस्ते विजेते व उपविजेते संघांना चषक देऊन गौरविण्यात आले.

    यावेळी संघटनेचे सचिव फारुक शेख,डी एल हिंदी कनिष्ठ महाविद्यालयाचे आनंद पाठक व राजेंद्र कोळी रायसोनीचे जयंत जाधव क्रीडा समन्विका सुजाता गुल्हाणे, अडव्होकेट आमीर शेख व सेंट्रल रेल्वे चे नितीन डेव्हिड यांची उपस्थिती होती.

    १९वर्षातील मुलांच्या स्पर्धेचा निकाल

    १. जी एच रायसोनी वि.वि डी डी एस जी डी चोपडा
    २-०
    २. डी एल हिंदी वि.वि प्रताप कॉलेज अमळनेर
    २-०
    उपांत फेरी
    ३. जी एच रायसोनी वि.वि इंद्राबाई ललवाणी
    ३-२ (पेनल्टी )
    ४. डी एल हिंदी वि.वि डॉक्टर झाकीर हुसेन
    २-०
    अंतिम सामना
    ५. डी एल हिंदी वि.वि जी एच रायसोनी
    ३-०
    स्पर्धेचे पंच

    आकाश कांबळे ,निलेश पाटील, धनंजय धनगर, सुरज सपके,दीपक सस्ते, संजय कांदेकर ,हर्षद शेख ,वसीम शेख ,आयान शेख, लोकेश मांजरेकर, सिद्धार्थ अडकमोल, कुलदीप पाटील, कौशल पवार.

    #football #sports jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    धानोऱ्यातील शेतकऱ्याच्या खात्यावर सायबर डल्ला!

    August 9, 2026

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif