चोपड्यात गावठी बनावटीची फूट रायफल हस्तगत

0

चोपडाः तालुक्यातील ग्रामीण पोलीस हद्दीत गलवाडे बुधगाव जवळ गावठी बनावटीची फूट रायफल आरोपितांकडून मिळून आली.

 

दोन इसम मोटारसायकलवर जात असताना रात्रीची गस्त घालणारे पोलिसांना ह्या दोघावर संशय आल्याने ह्यांना थांबविण्यासाठी हटकले असता. मोटारसायकलच्या मागच्या सिटवर बसलेला आरोपी पोलीसांना पाहताच मोटार सायकलवरुन उडी मारुन अंधाराचा फायदा घेवुन आरोपी कांतीलाल

 

दुरसिंग पावरा ( रा. महादेव दोंदवाडे ता शिरपुर जि.धुळे) याने पळ काढला. सदरील गुन्ह्यातील दुसरा आरोपी रमेश मालसिंग पावरा (वय ३३ रा महादेव दोंदवाडे ता शिरपुर जि धुळे) याच्याजवळ गावठी बनावटीची रायफल विना परवाना स्वताचे फायद्याकरीता जवळ बाळगतांना मिळून आले. पोहेकॉ राकेश तानकू पाटील यांच्या फिर्यादि वरून चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

आरोपी कडून ८० हजार रुपयांची एक गावठी बनावटीचा साडेचार फुट  रायफल तसेच ६० हजार किंमतीची शाईन हिरो होंडा कंपनीची काळ्या रंगाची त्यावर लाल पट्टे असलेली बिना नंबर प्लेट असलेली अशी एकूण १ लाख ४० हजार रु चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोहेकॉ राकेश तानकू पाटील यांच्या फिर्यादि वरून चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ लक्ष्मण शिंगाणे व राकेश पाटील करीत आहे. एक आरोपीला अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.