पहुर येथे विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

0

पहुर, ता. जामनेर : येथून जवळच असलेल्या कपाशीच्या येथील अविवाहित तरुणाचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना १२ रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली.

 

पहुर पेठच्या आंबेडकर नगरमधील रहिवासी आनंदा सांडू मोरे यांचा लहान मुलगा समाधान आनंदा मोरे (वय ३४) या अविवाहित तरुणाचा लोंढरी शिवारातील शेतात बेलाची पाने तोडण्यासाठी गेला होता. त्याच शेतात कपाशीमध्ये वीज तार तुटलेली होती. सोबत त्याची मोठी बहिण आशाबाई मोरे, चुलत बहिण सारिका मोरे, शैलाबाई घोडेस्वार या तिघ होत्या. तीनही जण नेहमीप्रमाणे बेलाची पान तोडण्यासाठी जात असताना वाटेत तुटलेल्या वीजेच्या तारेवर आशाबाई मोरे यांचा पाय पडला. हे पाहुन आशाबाई यांना वाचवण्यासाठी समाधान मोरे यांने हातात हा तार पकडला. त्याचवेळी विजेच्या जबर धक्क्याने समाधान मोरे याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव
घेत समाधान मोरे याला पहुर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, तपासणी करुन डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे सांगितले. समाधान मोरे याचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

या घटनेने पहूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मयत समाधान मोरे यांच्या पश्चात आई- वडील, दोन भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे. याबाबत पहुर पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.