जळगाव;- शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील रामदेवबाबा मंदिराजवळून एका तरुणाची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुबेर हमीद खाटीक (वय-३६) रा. रामदेवबाबा मंदीर, सुप्रीम कॉलनी, त्याच्याकडे (एमएच १९ सीडी ९५८४) क्रमांकाची दुचाकी आहे. या दुचाकीचा वापर दैनंदिन कामासाठी करत असतो, १० जुलै रोजी रात्री ११ वाजता जुबेर खाटीक यांनी त्याची दुचाकी घरासमोर पार्किंगला लावलेली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने पार्किंगला लावलेली दुचाकी चोरून नेली. हा प्रकार ११ जुलै रोजी सकाळी ७ वाजता समोर आला जुबेरने त्याच्या दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिलीनुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राठोड करीत आहे.