आव्हाने येथे अवैध वाळू डंपरवर कारवाई

0

जळगाव ;– तालुक्यातील आव्हाणे गावाजवळील मरीमाता मंदिराजवळून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या डंपरवर तालुका पोलिसांनी कारवाई केली असून याप्रकरणी डंपरचालक व मालक यांच्याविरोधात तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावातून डंपरव्दारे वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलिसांना मिळालया नुसार पोलिसांनी बुधवारी रात्री ११ वाजता गावातील मरिमाता मंदिराजवळ सापळा रचून डंपरवर कारवाई केली. या कारवाईत चालकाकडे वाळू वाहतुकीचा कुठलाही परवाना नसल्याचे समोर आले, तर दुसरीकडे चालक न थांबता डंपर घेवून पळून गेला, याप्रकरणी गुरुवारी तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचारी पोलीस नाईक किरण आगोणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन तालुका पोलीस ठाण्यात डंपरवरील चालक आणि मालक अशा दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल फेगडे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.