अकुलखेडा व चहार्डी फाट्याजवळील सौभाग्य लॉन येथील घटना
चोपडा;- साखरपुड्याच्या कार्यक्रमातून पर्समध्ये असलेल्या ११ लाख ७१ हजार किंमतीचे सोने चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना दि १९ रोजी दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान तालुक्यातील अकुलखेडा व चहार्डी फाट्याजवळील सौभाग्य लॉन येथे घडली आहे. चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चुंचाळे येथील रहिवासी असलेले देवेंद्र नारायण चौधरी यांच्या मुलीचा अकुलखेडा जवळील सौभाग्य लॉन्स येथे साखरपुड्याच्या कार्यक्रम होता.त्याठिकाणी देवेंद्र चौधरी यांच्या मुलीचे व पुतणीचे ११ लाख ७१ हजार किंमतीचे सोन्या चांदीच्या दागिने ठेवलेली पर्स आजीकडे ठेवली होती. ती पर्स घेऊन आजी सोफ्यावर बसलेल्या असताना पर्स सोफ्यावर बाजूला ठेवली. तेवढ्यात एका अज्ञात चोरट्याने ती पर्स लंपास करत पोबारा केल्याची घटना दि १९ रोजी दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान घडली आहे.
देवेंद्र नारायण चौधरी यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि संतोष चव्हाण हे करीत आहे.