Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»कुरियरने तलवार मागवणाऱ्या पिता पुत्राच्या मुसक्या आवळल्या
    गुन्हे वार्ता

    कुरियरने तलवार मागवणाऱ्या पिता पुत्राच्या मुसक्या आवळल्या

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 20, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर ;- कुरियरने तलवार मागवणाऱ्या गांधलीपुरा भागातील पिता पुत्राला पोलिसांनी रंगेहाथ् पकडून अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    शहरात एकाने तलवार मागवल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळाली. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे, हेडकॉन्स्टेबल शरद पाटील, रवींद्र पाटील, दीपक माळी, सिद्धांत शिसोदे याना दुपारी अर्बन बँकेच्या जवळ नाकाबंदी लावण्यास सांगितली.

    दुपारी २ वाजेच्या सुमारास स्टेशन रोड कडून मोटरसायकल क्रमांक (एम एच १५ जी क्यू ५९०४)वर अदनान सादिक खाटीक (वय १९) रा.मिलन चिकन, लक्ष्मी टॉकीज मागे गांधलीपुरा हा पांढऱ्या गोणीत झाकून तलवार आणताना आढळून आला. त्याला विचारपूस केली असता अदनान याने वडील सादिक सुपडू खाटीक (वय ४७) यांच्या नावाने तलवार मागवल्याचे सांगितले.

    पोलिसांनी दोघांना अटक करून शस्र कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अदनान याची मोटरसायकल आणि भ्रमणध्वनी असा एकूण १ लाख १२ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहेत.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #amalner #crime jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif