अमळनेर : – शशरातील एका बंद घरातून अज्ञात चोरटयांनी घराचा कडीकोयंडा आणि कुलूप तोडून घाट प्रवेश करून २२ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना ही घटना शहरातील ढेकू रोडवरील शास्त्री नगर भागात 18 ते 19 जून दरम्यान घडली. या प्रकरणी चोरट्यांविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील ढेकू रोडवरील शास्त्री नगर भागातील स्वामी समर्थ येथे हरीचंद्र वाडेकर राहता. शहरातील मुंदडा नगर भागात असल्याने वाडेकर दाम्पत्य रविवारी त्यांच्या घराला कुलूप लावून मुलीकडे गेले असता चोरट्यांनी घरफोडी करून ऐवज लांबविला . सोमवारी सकाळी सात वाजता हरीचंद्र वाडेकर घरी आल्यानंतर त्यांना घराचा कडी-कोंडा तुटलेला आढळला. चोरट्यांनी मागील दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून प्रवेश करीत सात ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, चार ग्रॅमचे सोन्याचे पेंडल, एक ग्रॅमचे किल्लू, दिड हजार रुपये किंमतीचे चांदीचे ब्रेसलेट असा एकूण 22 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला. तपास एएसआय बापू साळुंखे करीत आहेत.