Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    • ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»झोपेत असलेल्या वृध्‍द महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरट्यांनी लांबविली
    जळगाव जिल्हा

    झोपेत असलेल्या वृध्‍द महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरट्यांनी लांबविली

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 20, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

    यावल तालुक्यातील अंगणात खाटेवर झोपलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत अज्ञात दोन चोरट्यांनी धुम स्टाईल लांबविल्याची घटना घडली आहे. या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, लिलाबाई बुधा साळुंखे (वय-७०) रा.कोळन्हावी ता. यावल या वृद्धा महिला पती, मुलगा व सुन यांच्यासोबत वास्तव्याला आहे. नेहमीप्रमाणे १९ जून रोजी रात्री ९.३० वाजता त्या जेवण करून अंगणात खाटेवर झोपल्या होत्या. त्यांच्या बाजूला त्यांचे पती देखील दुसऱ्या खाटेवर झोपलेले होते. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास दोन चोरट्यांनी दुचाकीवर येऊन त्यांच्या गळ्यातील २५ हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत जबरी तोडून धूमस्टाईल लांबवल्याची घटना घडली. महिलेने आरडाओरड केली, परंतु तोपर्यंत दोन्ही चोरटे दुचाकीवर बसून पसार झाले होते. या संदर्भात महिलेने मंगळवार २० जून रोजी सकाळी यावल पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

    Chain Snickers Yawal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif