प्‍लॉट घेण्यासाठी माहेरहून ५० लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ

0

जळगाव ;- प्‍लॉट घेण्यासाठी माहेरहून ५० लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी
जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, जळगाव शहरातील खोटे नगर परिसरातील आराधना अपार्टमेंटयेथे माहेर असलेल्या रूपाली विशाल मैराळे (वय 38) यांचा विवाह २०११ मध्ये पनवेल येथील विशाल रमेश मैराळे यांच्याशी झाला. लग्नानंतर विवाहितेला प्लॉट घेण्यासाठी माहेरहून ५० लाख रुपये आणावे, अशी मागणी केली. दरम्यान विवाहितेने पैसे आणले नसल्याचा राग मनात ठेऊन पती विशाल मैराळे याने विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर सासू, सासरे व इतरांनी विविध विवाहितेच्या अंगावरील दागिने काढून घेतले. तसेच दमदाटी करून शारीरिक व मानसिक त्रास दिला. हा छळ सहन न झाल्याने विवाहिता जळगावी माहेरी निघून आल्या. याप्रकरणी बुधवारी ५ जुलै रोजी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पती विशाल रमेश मैराळे, सासरे रमेश उत्तम मैराळे, सासू उषा रमेश मैराळे, ननंद राजेश्वरी प्रशांत भंडारे, विशाखा राहुल गायकवाड सर्व रा.पनवेल मुंबई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रामकृष्ण इंगळे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.