व्यापाऱ्यांनीही उचलला पर्यावरण रक्षणाचा विडा !

0

पारोळा , लोकशाही न्यूज नेटवर्क

आजकाल वाढत चाललेल्या ग्लोबल वार्मीगने भल्या भल्याना पर्यावरणाचे महत्त्व समजू लागले आहे. एका कारखान्याच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात कुठलाही सत्काराचा मोठा गाजावाजा न करता आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचे स्वागत पर्यावरण पुरक असे रोपटे भेट देऊन करण्यात आले. त्यातच अनेकांनीही कारखाना मालकाला रोपटे भेट देऊन शुभेच्छा दिल्या. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही पर्यावरणाचे संरक्षण म्हणून त्याच्या रक्षणासाठी विडा उचलल्याचे दिसून आले.

या कार्यक्रमात आलेल्या प्रत्येक लहान मोठ्या उद्योगपती व्यापाऱ्यांनी आपल्या पसंतीच्या जातीचे रोपटे आग्रहाने मागून अथवा बदलून घेतले हि स्तुत्य बाब यावेळी लक्षात आली. यावरून प्रत्येकाला पर्यावरणाची काळजी असल्याचे चित्र दिसून आले.

खरे तर प्रत्येकाने पर्यावरणाचा ध्यास घेऊन आपला हातभार लावल्यास जागतिक तापमान वाढ अर्थात ग्लोबल वार्मिंगला थोड्या प्रमाणात का रोखू शकतो.

आज पर्यंत आम्ही अनेक शुभारंभाचा कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा अनुभव आला आहे. मात्र प्रत्येक ठिकाणी मोठ मोठे पुष्प गुच्छ देऊन आलेल्या प्रत्येकाला खुश करण्यासाठी अनेक प्रकारच्या भेट वस्तू दिल्या जात. परंतु आता खरोखरच लोकांना पर्यावरणचे महत्व पटु लागले आहे. त्यात आता व्यापारीही यात सहभाग नोंदवत असल्याने त्यांनीही पर्यावरण ण रक्षणाकरिता आपले योगदान देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकल्याची बाब स्वागतार्ह आहे. व्यापाऱ्यांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.