पंतप्रधान उद्यापासून चार दिवसांच्या दौऱ्यावर ; विविध विकासकांचे करणार उदघाटन

0

नवी दिल्ली ;- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 7 आणि 8 जुलै रोजी चार राज्यांना भेट देणार आहेत. यावेळी ते सुमारे 50,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. ते 7 जुलै रोजी छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश राज्याला भेट देणार आहेत.तर 8 जुलै रोजी पंतप्रधान तेलंगणा आणि राजस्थानला भेट देणार आहेत. या ठिकाणी ते विविध विकासकामांचा शुभारंभ करणार आहेत.

7 जुलैला म्हणजे उद्या सकाळी 10:45 च्या सुमाराला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रायपूरमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण होईल. उत्तर प्रदेशमधील गोरखपूर इथं दुपारी 2:30 च्या सुमाराला पंतप्रधानांचे आगमन होईल. तिथे गीता प्रेस गोरखपूरच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप समारंभात सहभागी होतील. त्यानंतर ते गोरखपूर रेल्वे स्थानकावर वंदे भारत रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर, संध्याकाळी 5 च्या सुमारास, वाराणसी येथे पंतप्रधानांचे आगमन होईल. तिथे ते एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण करतील.

दिनांक 8 जुलै रोजी सकाळी 10:45 वाजता, तेलंगणा राज्यातील वरंगल येथे पंतप्रधानांचे आगमन होणार असून ते एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील. या कार्यक्रमात ते विविध प्रकल्पांची पायाभरणी करतील. पंतप्रधानांचे दुपारी 4:15 च्या सुमारास बिकानेर येथे आगमन होईल. तिथे ते राजस्थानमधील विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण करतील.

 

Leave A Reply

Your email address will not be published.