उज्व्वल निकम यांची ‘राज’ कीय भेट

0

 

मुंबई – लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबईतील मतदानाची तारीख जशी जवळ येत आहे, तसं मित्र पक्षातील नेते एकमेकांच्या गाठीभेटी घेत असल्याचं बघायला मिळतंय. बुधवारी (1 मे) भाजपा नेते मिहीर कोटेचा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यानंतर शिवसेना (शिंदे गटाचे) खासदार श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे उमेदवार नरेश मस्के यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर आज (2 मे) भाजपाचे मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान जवळपास एक ते दीड तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

बुधवारी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ सभा घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. मात्र, ही सदिच्छ भेट असल्याचं सांगण्यात येतंय. तसंच कोकणात आणि मुंबईत राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळं राज ठाकरेंनी कोकणात किंवा मुंबईत सभा घ्यावी अशी भाजपाची इच्छा आहे. परंतु, राज ठाकरे सभा घेणार की नाही याकडं सर्वांचंच लक्ष लागलंय.

Leave A Reply

Your email address will not be published.