भातखंडे परिसरात वादळी वाऱ्यामुळे केळी लिंबू व आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

0

भातखंडे ता. भडगाव ;- येथील आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास या परिसरात सुमारे अर्धा तास जोरदार वादळाने धुमाकूळ घातला यात शेतकरी दयानंद यादव पाटील यांच्या शेतातील उत्राण अहिर हद्द या शिवारात साडेतीन हजार केळीचे झाड पूर्णपणे जमीनदोस्त झाले असून तीन एकर क्षेत्रात ही लागवड करण्यात आली होती.

 

सुमारे सात लाखापर्यंतचे नुकसान संबंधित शेतकऱ्याचे झाले असून पिक विमा काढण्यासाठी गेल्या चार दिवसापासून ऑनलाइन साईडवर पिक विमा काढण्यासाठी प्रयत्न करत होता . परंतु ती साईतट चालत नव्हती . त्यामुळे पिक विमा काढला गेला नाही असे संबंधित शेतकऱ्याचे म्हणणे आहे . यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे . यासह भातखंडे सह परिसरात लिंबू व आंब्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून झाडे मोठ्या प्रमाणात उमळून पडलेले आहे .

 

तरी संबंधित शेतकरी बांधवांच्या फळबागेबाबत नुकसान भरपाई मिळण्यासाठी संबंधित तलाठ्यांमार्फत तात्काळ पंचनामे होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा व त्यांची ही झालेली मोठी हानी यातून त्यांना कसे सावरता येईल याबाबत शासनाने दिलासा द्यावा अशी अपेक्षा संबंधित शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.