चोपडा राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष पदासाठी बाळासाहेब पाटील यांना पसंती

0

चोपड़ा.;- गेल्या अनेक वर्षा पासून राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पद चांगल्या प्रकारे भूषवून अरुण भाई गुजराथी यांच्या सोबत कायम च सावली सारखे मागे उभे राहणारे राजेन्द्र पाटील यांनी नुकताच शिवसेनेत (शिंदे गट)प्रवेश केल्यामुळे रिक्त असलेली तालुकाध्यक्ष पदाची जागा माजी झेड पी सदस्य बाळासाहेब पाटील यांना मिळावी म्हणून तालुक्यातील सर्वच लहान मोठे कार्यकर्ते उत्सुक असुन बाळासाहेब च या पदासाठी योग्य राहतील व तेच योग्य न्याय देवू शकतील म्हणून अनेक आजी माजी पदाधिकारी पक्ष श्रेष्ठिकड़े मागणी करणार असल्याचे व सोशल मिडिया वर सर्वच ग्रुप वर तसे मैसेज व्हायरल होत असुन पुढील विधानसभा व लोकसभा व विविध निवडणूका बघता त्यांना संधी मिळावी म्हणून सर्वच पक्षातील लोकांची मर्जी पाहायला मिळते आहे.

बाळासाहेब पाटील हे सर्वाना सोबत घेवून चालणारे व्यक्तीमत्व असुन प्रत्येक समाजाला न्याय देतात,सर्वच लोकांना मान्य असणार व्यक्तीमत्व असुन ते राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे व अरुणभाई गुजराथी यांचे एकनिष्ठ मानले जातात.त्यांनी पक्षाच्या राज्याच्या कमेटी वर ही काम केले असुन एक निडर,विश्वासु,डैशिंग,विविध पदाला न्याय देणारे,अभ्यासु,प्रत्येक कार्यकर्त्यांच्या सुखादुखात मदत करणारे,म्हणून त्यांची ओळख आहे.

तरुण असो की बुजुर्ग प्रत्येकाला जवळ वाटणारे नेतृव.

झेड पी सदस्य असताना लाखो रुपये ची काम करुंन,ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न समझून घेवून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सतत लढणारे व तालुक्यातील खराब रस्ते व विविध समस्या लक्ष्यात घेवून जनतेच्या न्याय हक्कासाठी उपोषण यशस्वी केल्यामुळे सर्वच जनतेच्या मनात बाळासाहेब पाटील हीरो ठरले आहेत.

वर्डी गावातील व आजूबाजू च्या परिसरातील ग्रामीण भागात बाळासाहेब यांना मानणांरा मोठा वर्ग असुन तालुक्यात गुर्जर समाज मोठा असुन उच्च शिक्षित, बुद्धिमान, व सर्वच बाबतीत अग्रेसर असुन नुकतेच शिवसेनेत राजेन्द्र पाटील गेल्यामुळे राष्ट्रवादी कांग्रेस मधे जी पोकळी निर्माण झाली ती भरण्या करता बाळासाहेब पाटील यांच्या शिवाय पर्याय नाही अस सर्वच तालुक्यातील नेते व पदाधिकारी यांचे मत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.