चोपड्यात एकाने घेतला गळफास

0

चोपडा ;- शहरातील मल्हारपुरा भागात एका ४० वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना या प्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मूर्तीची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की चोपडा शहरातील मल्हारपुरा येथील ब्रह्मकुमार दिलीप पाटील वय 40 यांनी गळफास घेतल्याने त्यांच्या नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्ना पाटील यांनी तपासून मयत घोषित केले. त्यांनी दिलेल्या खबरीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मूर्तीची नोंद करण्यात आली असून तपास मधुकर पवार करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.