रस्ता अडवून शिक्षकाला बेदम मारहाण

0

जळगाव;- तालुक्यातील नशिराबाद येथील उर्दू शाळेत मुख्याध्यापक पदाचा चार्ज घेण्यासाठी जाणाऱ्या एका उपशिक्षकाला रस्ता अडवून त्याला शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना 11 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की मेहरून परिसरातील असा नगर भागात जळगाव येथे राहणाऱ्या शेख साबीर अहमद खलीलोदिन व 48 हे उपशिक्षक असून ते 11 ऑगस्ट रोजी के एस टी उर्दू हायस्कूल नशिराबाद येथे मुख्याध्यापक पदाचा चार्ज घेऊ नये यासाठी आरोपी वसीम अक्रम शेख मुसा रा. नशिराबाद याने सकाळी आठ वाजेच्या सुमारास उर्दू हायस्कूल नशिराबाद येथे शेख साबीर यांना अडवून मारहाण केली व स्टाफ रूम मध्ये मारहाण केली तू शाळेत कसा येतो अशी धमकी देऊन ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला वसीम अक्रम शेख मुसा याचा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोहे का अतुल महाजन करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.