तू आज सुटली तरी तुझ्यावर … केल्याशिवाय राहणार नाही…

0

जामनेर ;- तालुक्यातील एका गावात मजुरी करून निर्वाह करणाऱ्या 32 वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिचा हात पकडून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून ‘तू आज सुटली तरी तुझ्यावर बलात्कार केल्याशिवाय राहणार नाही’ अशी धमकी देऊन भावाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकावर जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की तालुक्यात एका गावात राहणाऱ्या महिलेच्या घरात आरोपी रमेश मच्छिंद्र चव्हाण रा. ओझर याने 8 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घुसून महिलेचा हात पकडून तिला इतर ठिकाणी स्पर्श करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. मात्र महिलेने त्याला प्रतिकार केल्याने त्याने तू आज सुटली तरी तुझ्यावर बलात्कार केल्याशिवाय राहणार नाही अशी धमकी दिली. तसेच तुझ्या भावालाही ठार मारेल अशी धमकी दिल्याप्रकरणी आरोपी रमेश चव्हाण यांच्याविरुद्ध 11 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मुकुंदा पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.