धक्कादायक; साखरपुडा मोडल्यामुळे हैवानाने घरात घुसून कापले मुलीचे शीर…

0

 

क्राईम, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

कर्नाटकातील एका गावात एका 16 वर्षीय मुलीची 32 वर्षीय व्यक्तीने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल प्रकाश आणि मुलीचा साखरपुडा होणार होता, मात्र कोणीतरी याबाबत बाल आयोगाला माहिती दिली. या प्रकरणाची माहिती मिळताच आयोगाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही कुटुंबीयांना सांगितले की, मुलगी अल्पवयीन आहे, त्यामुळे हा साखरपुडा होऊ शकत नाही.

यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी सहमती दर्शवत लग्न रद्द केले. सायंकाळी पाचच्या सुमारास प्रकाश याने मुलीच्या घरात घुसून मुलीच्या पालकांवर हल्ला केला. आणि मुलीला घराबाहेर ओढून तिचा शिरच्छेद करून तिची हत्या केली. आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. कालच मुलीचा दहावीचा निकाल आला आणि ती पास झाली. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.