अमळनेरकरांच्या उदंड प्रतिसादात महायुतीचा महामेळावा

0

अमळनेर, लोकशाही न्युज नेटवर्क-

महायुतीच्या जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या मेळाव्याला मंत्री गिरीश महाजन, अनिल पाटील, गुलाबराव पाटील यांनी संबोधित केले. या सभेत अमळनेरकरांमध्ये प्रचंड उत्साह होता. सभेचा परिसर अबकी बार मोदी सरकार या घोषणांनी दणाणून गेला होता. यावेळी सर्व उपस्थित नागरिकांना देशाच्या विकासासाठी मतदानरुपी महायुतीला साथ देण्याचे आवाहन केले.
मंत्री गिरीष महाजन, अनिल पाटील, शिरीष पाटील, जयश्री पाटील, रिता बाविस्कर, उमेश नेमाडे, भागवत पाटील, हिरालाल पाटील, प्रथमेश पवार, यशवंत बैसाने, संदीप काटे, लालचंद सैनानी, सुभाष चौधरी, मुख्तार खाटीक, अशोक पाटील, व्ही. आर. पाटील, शाम अहिरे, मीना पाटील, राजश्री बोलके, समाधान धनगर, विनोद जाधव, बाळासाहेब पाटील, सुषमा देसले यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.