लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वेगळे चित्र असणार !
पंतप्रधान मोदींचा मोठा दावा : भविष्याचा आरसा दाखवला
मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क
लोकसभा निवडणुकीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध माध्यमांशी बोलत आहेत. दि. 4 जूनच्या निकालानंतर सेन्सेक्स इतकी मोठी भरारी घेईल की स्टॉक मार्केट प्रोग्रामर देखील थकतील. या मुलाखतीदरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की भाजप सरकारच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात सेन्सेक्सने 25 हजार ते 75 हजारांपर्यंतचा मोठा प्रवास केला असून सध्याच्या सरकारचे व्हिजन आणि 4 जूनच्या निकालानंतरचे भारताचे भविष्यातील चित्र याबद्दल त्यांनी मनमोकळेपणाने भाष्य केले. उल्लेखनीय म्हणजे, या लोकसभा निवडणुकीत पीएम मोदींनी भाजपसाठी ‘370’ आणि एनडीएसाठी ‘400 पार’चे लक्ष्य ठेवले आहे.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘त्यांच्या सरकारने सर्वाधिक आर्थिक सुधारणा केल्या आहेत. उद्योजकता समर्थक धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळते तर शेअर बाजाराबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की 2014 मध्ये सेन्सेक्स 25 हजारांवर होता जो आज 75 हजारांवर पोहोचला आहे. जेवढे सामान्य नागरिक या क्षेत्रात येतील तेवढी अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. प्रत्येक नागरिकामध्ये जोखीम घेण्याची क्षमता थोडी वाढली पाहिजे अस मला वाटते, हे खूप महत्त्वाचे आहे. काय करावे याचा विचार करूनही फायदा होत नाही.’
‘एचएएलकडे बघा, ज्यासंदर्भात त्यांनी (विरोधक) हल्लाबोल केला होता, कामगारांना भडकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. आज एचएएलने चौथ्या तिमाहीत विक्रमी नफा कमावला आहे.’ अलीकडेच HAL ने चौथ्या तिमाहीचे निकाल जारी केले ज्यात कंपनीला 4 हजार कोटी रुपयांचा नफा झाला असून HAL ने आपल्या इतिहासात प्रथमच इतका नफा कमावला आहे. भारताच्या डिजिटल क्रांतीचा आवाज जगभरात घुमत असून जगभरातील लोक चर्चा करत आहेत.
शेअर बाजारावर पंतप्रधान मोदींचे भाकीत
शेअर बाजारावर सविस्तर चर्चा करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जूनला येतील. तुम्हाला दिसेल की आठवडाभरात भारताचा शेअर बाजार आणि त्यांचे प्रोग्रामिंग करणारे सगळे थकून जातील. आता पहा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांचे शेअर्स कुठे पोहोचले आहेत. हा स्टॉक घसरणारच होता, पण आता शेअर बाजारात त्याचे भाव वाढत आहेत.’ पंतप्रधानांनी यादरम्यान, HAL चे उदाहरण दिले.