लोकसभेनंतर कर्नाटकात महाराष्ट्रासारखे ऑपरेशन लोटस!

भाजपवालेही कोण हा ‘नाथ’ पहायला आले : शिंदे

0

नाशिक, लोकशाही न्युज नेटवर्क –

लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकात देखील ‘ऑपरेशन नाथ’ (ऑपरेशन लोटस) राबविले जाणार असल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. कर्नाटकमध्ये प्रचारासाठी गेलो असता, मला भाजपचे लोक भेटायला आले. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हा ‘नाथ’ हे त्यांना पाहायचे होते. लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकातही ‘नाथ ऑपरेशन’ होणार असल्याचे आपण त्यांना सांगितले, असा दावा शिंदे यांनी यावेळी केला.
नाशिक लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवारी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी शिंदे यांनी आपण केलेल्या बंडखोरीचा दाखला देतानाच लोकसभेनंतर कर्नाटक सरकार कोसळणार असल्याचा दावा केला. मी निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने बेळगाव येथे गेल्यानंतर उत्सुकतेने तेथील भाजप पदाधिकारी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून भेटायला आले. कोण हा ‘नाथ’ हे त्यांना पाहायचे होते. त्यावेळी त्यांना लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकातही नाथ ऑपरेशन होणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, याच विषयावर माध्यमांशी स्वतंत्रपणे संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी ते जाऊ द्या असे सांगताना हास्य करीत उत्तर देण्याचे टाळले.

‘ती’ ताकद बाळासाहेबांमध्येच!
दुसरीकडे, सर्वसामान्य माणसांना मोठे करण्याची ताकद फक्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये होती. त्यांनी रिक्षेवाला, टपरीवाला अशा सर्वसामान्य नागरिकांना मोठे केले. शिवसैनिकांमुळे शिवसेना मोठी झाली, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारासाठी बजाजनगर येथे मंगळवारी रात्री झालेल्या सभेत काढले.

Leave A Reply

Your email address will not be published.