रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ मंत्री महाजनांची रॅली

0

जामनेर, लोकशाही न्युज नेटवर्क-

रावेर लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ शहरात मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी मतदारांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जामनेर शहर व तालुक्यातील विविध ठिकाणी रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, नगराध्यक्षा साधना पाटील, उमेदवार रक्षा खडसे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी मतदारांशी संवाद साधत मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी ढोल-ताश्यांच्या गजरात रॅली शहरातील विविध भागातून काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. जामनेर शहर व तालुक्यातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रासप, मनसे या मित्र पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.