संशयावरून तरुणावर शस्त्राने वार ; चाळीसगावात घटना

0

चाळीसगाव;– माध्यमिक शाळेजवळ शिवीगाळ केल्याच्या संशयावरून एका तरूणावर धारदार हत्याराने वार करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील गणेशपूर येथे शनिवारी १८ मे रोजी रात्री ९ वाजता घडली. याप्रकरणी रविवारी १९ मे रोजी मध्यरात्री २ वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्केश कारभारी शिंदे वय ३८ रा. गणेशपूर ता. चाळीसगाव येथे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शनिवारी १८ मे रोजी रात्री ९ वाजता अल्केश शिंदे हा त्यांच्या मित्रांसोबत गावातील मध्यमिक शाळेजवळ गप्पा मारत होता. त्यावेळी गावात राहणारा भगवत सयाजी निकम व त्याच्या सोबतचे तीन जणांनी शिवीगाळ केल्याचा संशयावरून भागवत निकम याने अल्केशला मारहाण केली. त्यानंतर खिश्यातून धारदार हत्याराने वार करून जखमी केले. तर इतर सोबत असलेले अनोळखी तीन जणांनी देखील मारहाण केली. रविवारी १९ मे रोजी मध्यरात्री २ वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गणेश चव्हाण हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.