शौचालयाला जाऊन येते असे सांगून पत्नी झाली बेपत्ता

0

सावदा ;- रावेर तालुक्यातील लहान वाघोदा येथून २० वर्षीय विवाहिता शौचालयाला जाऊन येते असे सांगून बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने दिल्यावरून सावदा पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

बाबत माहिती अशी की लहान वाघोदा ता. रावेर येथे राहणारे मोहन राजाराम बारेला वय 28 हे हात मजुरी करतात. ७ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी शिलाबाई मोहन बारेला वय 20 ही तिच्या चुलत ननंदकडे झोपलेली असताना शौचालयाला जाऊन येते असे सांगून निघून गेली. मात्र तिचा नातेवाईकांकडे सर्वत्र शोध घेऊनही ती न मिळून आल्याने 11 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता सावदा पोलीस स्टेशनला मोहन बारेला यांनी फिर्यादी दिल्यावरून हरविल्याची नोंद करण्यात आली आहे तपास पोहे को सजीव चौधरी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.