डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण ; दोघांना जन्मठेप, तिघांची सुटका

0

पुणे,लोकशाही न्युज नेटवर्क –

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात विशेष न्यायालयानं निकाल दिला आहे. पाचपैकी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. आरोपी विरेंद्र तावडे, ऍड संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांची न्यायालयानं पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे. दाभोलकर यांची २०१३ मध्ये पुण्यात हत्या झाली होती. त्यांच्या हत्येला पावणे अकरा वर्ष उलटली आहेत.

२० ऑगस्ट २०१३ रोजी अंनिसचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकरांची पुण्यात दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ओमकारेश्वर पुलावर त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात एकूण पाच आरोपी होते. सचिन अंदुरे, शरद कळसकर या दोघांनी दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या होत्या. दोन्ही हल्लेखोरांना न्यायालयानं दोषी धरलं आहे. त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.