बहिणीची छेड काढल्याच्या रागातून भावावर चाकूने हल्ला

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
बहिणीची छेड काढली म्हणून त्याचा जाब विचारण्यास गेलेल्या भावावर चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना जळगावात घडली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जितू प्रकाश गारूंगे (३९, रा.जाखनी नगर) असे जखमी युवकाचे नाव आहे. जाखनी नगरात राहणाऱ्या जितूला सोमवारी सायंकाळी काही तरूणांनी बहिणीची छेड काढल्याची बाब जितूला त्याच्या बहिणीने दिल्याने जीतू जाब विचारण्यासाठी गेला. बहिणीची छेड का काढली असा टवाळखोरांना विचारल्यावर त्यांनी जितू याला लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यानंतर एकाने तलवारने डोळयावर वार केला. यात जितू हा गंभीर जखमी झाला. हा प्रकार त्याच्या कुटूंबियांना कळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेवून भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर गंभीर जखमी जितू याला जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.