सुटकार येथे एकावर प्राणघातक हल्ला ; दोघांना अटक

0

धानोरा, ता. चोपडा ;-  सुटकार येथे किरकोळ वादातून एकावर धारदार गुप्तीने वार करून प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी तिघांविरुध्द अडावद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अडावद पोलीस स्थानकांत ईश्वर हरी ठाकरे रा. सुटकार यांच्या फिर्यादीनुसार अरुण दामु सोनवण अश्विन विनोद सोनवणे जयेश अरुण सोनवणे ( सर्व राहणार सुटकार ता. चोपडा ) या तिघांनी किरकोळ वादातून – ईश्वर ठाकरे यांचे चुलत भाऊ गणेश भास्कर ठाकरे याला जिवेठार मारण्याच्या उद्देशाने लाकडी दांडके लोखंडी आसारीसह धारधार गुप्तीने हल्ला चढवला. तसेच अरुण सोनवणे अश्विन सोनवणे हे दोघे गावात व गल्ली त किरकोळ कारणावरूण भांडण करुन लोकांमंध्ये निर्माण करतात ठाकरे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास स.पो.नि. गणेश बुवा करीत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.