विद्यार्थ्यांचे बळजबरीने पैसे हिसकावून लोखंडी रॉडने मारहाण

0

चोपडा ;- शहरातील मुस्लिम कब्रस्थानजवळ एकास काहीही कारण नसताना त्याच्या खिशातील ८०० रुपये हिसकावून डोक्यात लोखंडी रॉड टाकून मारहाण केल्याची घटना २८ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, नूर मोहम्मद पिंजारी वय २३ हा विद्यार्थी शिक्षण घेत असून २८ रोजी मुस्लिम कब्रस्थान रोडवर सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास चालत असताना आरोपी सत्यम चैत्राम पाटील , बंटी उर्फ जयेश शांताराम कोळी, रा. चोपडा यांनी नूर मोहम्मद याला काहीही कारण नसताना लोखंडी रॉड डोक्यात टाकून दुखापत केली. तसेच त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच हाताच्या पंजावर चाकूने मारहाण करून खिशातील ८०० रुपये हिसकावून घेतले. याप्रकरणी नूर मोहम्मद याच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उप निरीक्षक घनशाम तांबे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.