पारोळा येथे जिनिंगला आग, लाखो रुपयांचा कापूस जळून खाक

0

पारोळा –येथील अमळनेर रस्त्यावरील वंजारी फाट्या समोरील रोहित जिनिंगला रात्री आठ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागून लाखो रुपयांचा कापूसासह यंत्र सामग्री जळून खाक झाल्याची घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा शहरालगत असलेल्या रोहित जिंनिगला रात्री च्या सुमारास आग लागली

आग आटोक्यात आणण्यासाठी पारोळा अमळनेर एरंडोल धरणगाव येथील अग्निशामक बंबाना पाचारण करण्यात आले होते रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न चालू होते, यावेळी शहरातील सर्व जिनिंग मालक व्यापारी ग्रामस्थांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. हि आग पाहणाऱ्या नागरिकांच्या मते सांगितले की आजपर्यंतच्या आगीत ही सर्वात मोठी आग असल्याचे सांगितले यावेळी पारोळ्याचे तहसिलदार डॉ उल्हास देवरे पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे उपनिरीक्षक राजू जाधव गंभीर शिंदे यांच्यासह इतर कर्मचारी पारोळा नगरपरिषदेचे अग्निशामक बंबाचे चालक मनोज पाटील व कर्मचाऱ्यांनी प्रथम घटनास्थळी येऊन आग विझवण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.