लासूर येथे प्रजापिता ब्रम्हाकुमारी केंद्राच्या वतीने रक्षाबंधन

0

 

लासूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

येथे‌ प्रजापिता ब्रम्हाकुमारी‌ चोपडा केंद्राच्या माध्यमातून लासूर केंद्रात रक्षाबंधनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी चोपडा केंद्राच्या संचालिका मंगला दिदि,राजदिदी‌ यांनी रक्षाबंधनाचे‌ महत्व तसेच परमपिता परमेश्वर तसेच‌ आत्मा‌ या बाबतीत सविस्तर माहिती दिली. ओमशांती परीवाराचे कार्यबाबतीत विक्रम जावरे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी ‌लासूर येथे‌ पोलिस पाटील म्हणून जितेंद्र राजेंद्र पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार मंगला दिदि व‌ राजदिदि‌ यांचे हस्ते करण्यात आला. दरम्यान मंगला दिदि, राजदिदि, लासुर‌ केंदाच्या निर्मला दिदि यांनी‌ उपस्थित सर्व बंधु‌ भगिनींना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी चोपडा पं‌.स.चे. माजी‌ सदस्य अनिल पाटील, उपेन्द्र पाटील, बापू चौधरी, दिलीप पालीवाल,‌ चंद्रकांत वाघ, दिनेश पाटील, अरूण भाऊसाहेब, पंजाबराव पाटील, पो‌.पा.जितेंद्र‌ पाटील, प्रशांत पाटील यांच्यासह चोपडा केंद्राचे भरत पाटील, डॉ.इश्वरभाई‌ तसेच ओमशांती परीवाराचे बंधू, भगिनी‌ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.