मयत कर्मचाऱ्याकडून कोणत्याही प्रकारची वसुली करता येणार नाही – जि प सेवानिवृत्त कर्मचारी कल्याण समिती

0

 

मलकापुर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

जिल्हा परिषद कर्मचाऱ्याकडे सेवा काळातील कोणत्याही प्रकारची वसुली सदर कर्मचारी मृत्यू पावल्यास त्याच्याकडून वसुली करता येणार नाही, अशी तरतूद महाराष्ट्र नागरी सेवा 1981 मधील कलम 72 (2) नुसार करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने परिपत्रक क्रमांक डीएन‌ई१००६/प्रक्र 564/आ 12 दिनांक 4 जुलै २००६ च्या परिपत्रकात स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे.

बुलढाणा जिल्हा परिषदेने खाते चौकशी प्रकरणात निकाल देताना काही मयत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तसा निकाल दिलेला आहे, परंतु काही प्रकरणात मात्र काही अधिकाऱ्यांच्या अज्ञानामुळे काही मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अडचण निर्माण झालेले आहेत. प्रशासनाने अशा प्रकार प्रकरणांमध्ये त्वरित नियमानुसार निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांच्या वारसांना दिलासा द्यावा, अशी विनंती बुलढाणा जिल्हा परिषद सेवा निवृत्त कर्मचारी कल्याण समिती यांच्या वतीने अध्यक्ष प्रभाकर डुकरे, सरचिटणीस रमेश होले यांनी प्रसिद्ध पत्रकार द्वारे दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.