चोपड्यात हार्डवेअरचे दुकान फोडून २ लाख ९२ हजारांचो रोकड लांबविली

0

चोपडा ;- शहरातील एमजी कॉलेज जवंळ बंधन बँकेच्या शेजारी असणारे हार्डवेअरच्या दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी २ लाख ९२ हजारांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, गोपाळ श्रीराम पाटील वय ५२ यांचे समर्थ ट्रेडर्स नावाचे हार्डवेअरचे दुकान असून अज्ञात चोरटयांनी हार्डवेअर दुकानाचे कुलुपाची कडी कोयंडा तोडून त्यातील २ लाख ९२ हजारांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोहेकॉ दीपक विसावे तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.