जामनेरात घरफोडी ; ६९ हजारांचा ऐवज लंपास

0

जामनेर ;- शहरातील नाहाटा नगर हिवरखेडा रोडवर असणाऱ्या एका बंद घराचा कुलूप आणि कडी कोयंडा तोडून ६९ हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आलाय असून याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, पंचायत समितीच्या आरोग्य विभागात नोकरी करणाऱ्या सोनल प्रल्हाद पाटील वय ३२ यांचे नाहाटा नगरात घर असून अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून लोखंडी कपाटाच्या लोकरमधून २४ हजार रुपये किमतीचे ८ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, २ ग्राम सोन्याच्या ६ हजार किमतीच्या कानातील बाली , ३० हजार किमतीचे ८० भार विजांच्या चांदीच्या ३ मोठे कडे , लहान मुलांचे जोडवे असा एकूण ६९ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार १२ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान उघडकीस आला . याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोहेकॉ अनिल चाटे करीत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.