विद्यार्थी सेवा समितीच्या वतीने गरजूंना वह्या वाटप

0

भडगाव ;- विद्यार्थ्यांच्या सेवेत कार्यरत असणाऱ्या विद्यार्थी सेवा समिती च्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे संच नुकतेच वाटप करण्यात आले. जवळपास सर्वच विद्यार्थी हे एकल माता पालकांचे पाल्य आहेत. यावेळी काही विद्यार्थ्यांच्या वतीने पालक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपापला परिचय करून दिला. विद्यार्थी सेवा समितीचे समन्वयक योगेश शिंपी यांनी प्रास्तविकातून समितीच्या स्थापनेमागील प्रेरणा व कार्यपद्धती विशद केली. विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत व्हावी, यासाठी गरजवंताना समितीच्या माध्यमातून वह्या, पुस्तके, फी, सायकल, करिअर मार्गदर्शन याविषयी सहाय्य करण्यात येणार आहे. समाजातून अनेक मदतीचे हात ह्या कार्यासाठी पुढे येत आहेत. कार्यक्रमादरम्यान अनाथ असलेल्या सोनालीचे “शैक्षणिक पालकत्व” समितीने स्विकारले. तर 2 विद्यार्थ्यांचे 12 वी पर्यंत चे “शैक्षणिक पालकत्व” संवेदनशील व्यक्ती प्रा.डॉ.दिनेश तांदळे यांनी स्वीकारले.
कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन, तर प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवक प्रा.डॉ.दीपक मराठे, प्रा.डॉ.दिनेश तांदळे, प्राचार्य हेमंत खैरनार, सामाजिक कार्यकर्ते बन्सीलाल परदेशी व्यासपीठावर उपस्थित होते.
सुत्रसंचलन योगेश शिंपी यांनी केले तर आभार प्रदर्शन सुशील माळी यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.