धक्कादायक : नराधम बापानेच केला ९ वर्षीय मुलीवर अत्याचार ; चाळीसगाव तालुक्यातील घटना

0

चाळीसगाव ;- नराधम बापाने आपल्या अवघ्या नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना रविवार रात्री ११ वाजेच्या सुमारास एका गावात उघडकीस आली असून त्याला अटक करण्यात आली आहे. सावळीराम दिलीप गायकवाड (चाळीसगाव तालुका) असे अटकेतील नराधमाचे नाव आहे.

चाळीसगाव तालुक्यातील एका गावात प्रतिकुल परीस्थितीत उदरनिर्वाह करणार्‍या कुटूंबातील पीडीत मुलीची आई आजारी असल्याने व घरात सलाईन लावण्यासाठी जागा नसल्याने दिराच्या घरी सलाईन लावण्यासाठी गेल्याने नऊ वर्षीय चिमुकली घरात एकट असतानाच नराधम बापाने तिच्यावर अतिप्रसंग केला. रविवारी रात्री 11 वाजता आई घरी आल्यावर घाबरलेल्या पीडीतेने हा प्रकार सांगितला. दिड महिन्यापूर्वीही या नराधम बापाने असाच प्रकार केल्याची माहिती पीडिताने सांगितल्यानंतर सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली. या प्रकाराचा जाब घरच्या लोकांनी विचारल्यानंतर हा नराधम पळाला. याबाबत पीडीतेच्या आईने चाळीसगाव शहर पोलिसात सोमवारी रात्री तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. नराधम पित्याला अटक करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.