पिपरपाडा येथे सर्पदंशाने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

0

चोपडा;- तालुक्यातील आदिवासी भागातील मुळ्यावतार गावानजीक असणाऱ्या पिपरपाडा या पाड्यातील आदिवासी मुलाचा दि. १८ रोजी सकाळी ६ वाजेदरम्यान सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

 

याबाबत सविस्तर असे की, मुळ्यावतार गावाजवळ असणाऱ्या पिंपरपाडा पाडा येथील ८ वित शिकणारा लखीराम सिताराम बारेला (वय १६) हा सकाळी झोपेतून उठून लघुशंकेसाठी घराबाहेर आला असता कोना जातीच्या विषारी सापाने त्याला देश केला. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला चोपड़ा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. इथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले, पो.स्टे. ला तशी नोंद करण्यात येऊन शवविच्छेदन डॉ. सागर पाटील यांनी केले. यावेळी डॉ. चंद्रकांत बारेला उपस्थित होते, मृत लखीराम हा येथील हिंगणवाडे आश्रमशाळेत इयत्ता आठवीत शिकत होता..

Leave A Reply

Your email address will not be published.