‘चलती क्या खंडाला’ म्हणत केला विवाहितेचा विनयभंग

0

भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क

मोटार मोटार सायकलने विवाहितेचा पाठलाग करून ‘चलती क्या खंडाला’ असे गाणे म्हणत अश्लील हातवारे करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणाऱ्या आरोपी रोड रोमियो विरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टीपू उर्फ टिप्या इब्राहीम सत्तार मण्यार रा. वराडसिम ता. भुसावळ असे या तरुणाचे नाव आहे. विना क्रमांकाच्या मोटार सायकलने इब्राहीम उर्फ टिप्या याने एका विवाहीतेचा वराडसीम बस स्थानक परिसरात पाठलाग करून तिच्या समोर मोटारसायकल उभी करून चालती क्या खंडाळा हे गाणे गुणगुणून विवाहितेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून अश्लील भाषा वापरल्याची घटना 4 मार्च रोजी सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास घडली. त्याच्या या कृत्याला कंटाळून विवाहितेने भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून आरोपी टिपूविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक तपास अमोल पवार करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.