युवकांचे मानसशास्त्र..

0

लोकशाही, विशेष लेख

 

प्रामुख्याने मानसशास्त्रात (Psychology) मानव आणि प्राणी यांच्या वर्तनाचा सर्वसामावेशक अभ्यास केला जातो. मानसशास्त्राची उत्पत्ती ही प्रामुख्याने शरीर विज्ञान शास्त्र आणि तत्त्वज्ञान या दोन एकत्रित शास्त्रांच्या अभ्यासातून झाली आहे. मानसशास्त्रात व्यक्तीच्या जन्माच्या अगोदर असणाऱ्या घटक परिस्थितीचा त्याच बरोबर व्यक्तीच्या मृत्यूच्या पश्चात झालेल्या बदलांचा अभ्यास यात केला जातो. इतकी या शास्त्राच्या अभ्यासाची व्यापकता मोठी आहे. मानसशास्त्रात प्रामुख्याने डॉक्टर सिगमन फ्राईड, स्किनर, एरिक्सन, तर भारतीय मानसशास्त्रज्ञांमध्ये आचार्य चाणक्य (Acharya Chanakya), डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन(Dr. Sarvapalli Radhakrishnan), राजा राम मोहन रॉय (Raja Ram Mohan Roy), यासारख्या शास्त्रज्ञांचा समावेश होतो.

प्रामुख्याने मानसशास्त्रानुसार युवा अवस्था म्हणजे वयाच्या जन्मतारखेनुसार बारा ते अठरा वर्ष वयोगटात असणारा गट म्हणजे युवा किंवा त्यालाच आपण किशोर अवस्था असे देखील म्हणतो. सदरची युवा अवस्था ही प्रामुख्याने व्यक्तिगत भिन्नतेनुसार साधारणता २७ ते २८ वर्षापर्यंत. त्यात मुलं आणि मुली या प्रामुख्याने आढळत असल्याचे आपल्याला जाणवते. प्रामुख्याने मुली या मुलांपेक्षा मानसिक भावनिकआणि शारीरिक दृष्ट्या अधिक भारतीय हवामानात परिपक्व झालेल्या दिसतात.

युवा अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात शरीर अंतर्गत रासायनिक स्त्रावांची निर्मिती झाल्या कारणामुळे मोठ्या प्रमाणात शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदल हे युवकांमध्ये सहजपणे झाले असल्याचे आपल्याला दिसतात. युवा अवस्था ही प्रामुख्याने वादळ काळाची अवस्था आहे, असे देखील म्हटले जाते. या अवस्थेत युवकांमध्ये वर्चस्वाची प्रेरणा, स्व संकल्पना विकास, व्यक्तिमत्व विकास, पुढाकार घेण्याची वृत्ती, यासारख्या अनेक प्रेरणांचा विकास होत असल्याचे दिसते. युवा अवस्थेमध्ये प्रामुख्याने तदात्म्य भाव प्रेरणे मधून युवा पिढी समोर अनेक प्रकारचे आदर्श युवा पिढी आपल्यासमोर निर्माण करते त्यात मग राजकीय नेतृत्वाचे आदर्श, सेने अभिनेत्री अभिनेते यांच्या आदर्श, आवडत्या व्यक्तीचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासारखं राहण्याचा, वागण्याचा, त्यांचं अनुकरण करण्याचा युवा पिढी ही पुरेपूर प्रयत्न करते.

युवा वादळ अवस्थेमध्ये प्रामुख्याने युवक हे मैत्री, प्रेम प्रकरण, आणि करियर या त्रिकुटात अडकून पडतात. त्यातून स्वतःला सावरणे हे युवकांसाठीचे फार मोठे आव्हान आहे. या त्रिकुटांमधूनच बहुतांशी तरुण हे निराशेच्या आणि वैफल्याच्या आहारी जातात. त्यातूनच जळगाव जिल्ह्यात आम्ही राबवलेल्या प्रकल्पांमधून एक भयावह समाज चिंतन करायला लावणारे, आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारे निष्कर्ष म्हणजे युवा पिढी किंवा युवा अवस्थेतील वाढते आत्महत्या करण्याचे, अपघातामध्ये स्वतः बळी देण्याचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर योग्य ती उपाययोजना सर्व स्तरातून राबवली जावी की जेणेकरून या लेखाच्या लेखनाचे आणि प्रकाशाचे सार्थ हे योग्य पद्धतीने ठरेल.

प्रो. डॉ. आशिष एस. जाधव/बडगुजर.
पंकज कला वरिष्ठ महाविद्यालय, चोपडा.
9373681376
(फोन सकाळी ११ ते ०१ या वेळेत करावा)

Leave A Reply

Your email address will not be published.