कुलरचा शॉक लागून ५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

उन्हाच्या उकाड्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे लोक घरात थंडावा मिळावा म्हणून AC कुलर सारखे उपकरणे लावून घेतात. मात्र हे उपकरण कधी जीवावर बेततील याचा कोणालाही पत्ता नसतो. अशीच एक दुर्दैवी घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातून समोर आली आहे. दोन मुलींच्या पाठीवर जन्मलेल्या पाच वर्षीय चिमुकल्या बाळाचा कुलरचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सायंकाळी बिडगाव येथे घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.सोहेल जावेद तडवी वय पाच वर्षे असे मृत झालेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे.

जावेद इस्माईल तडवी यांना दोन मुलींच्या पाठीवर मुलगा झाला होता. एकुलता एक मुलगा सोहेल,दोन मुली पत्नी, आई वडिलांसह त्यांचे कुटुंब राहते. गुरूवारी सायंकाळी सोहेल हा जवळील दोन लहान मुलांसोबत खेळत होता. खेळत खेळत ते तिन्ही मुले जवळीलच मुजात महारू तडवी यांच्या घरात गेले तेथे पत्री कुलर लावलेले होते. त्यात विज प्रवाह ऊतरला होता. त्या कुलरला सोहेलचा धक्का लागला व तो जोरात फेकला गेला. जवळील मुलांनी आरडा-ओरड करताच. गर्दी जमा झाली व त्याला आधी धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात व तेथून रुग्णवाहिकेतून चोपडा येथे खासगी हास्पीटलला नेण्यात आले.तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित झाल्याचे केले.

उपजिल्हा रुग्णालयात त्याचे शेवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देताच आई वडीलांनी हंबरडा फोडत मोठा आक्रोश केला. रात्री उशिरा त्यांचेवर बिडगाव अंत्यसंस्कार करण्यात आले. क्रुर काळाने एकलुता एक मुलगा हिरावून नेल्याने आई वडील व नातेवाईकांचा आक्रोश मन सुन्न करणारा होता. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अडावद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.